मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे राहुलनगरात तुझ्या मुलाने माझ्या आईचा हात का पिरगळला अशी विचारणा करणाऱ्या राजेंद्र जिभाऊ थोरात या तरुणाचा नऊ जणांनी गुप्ती, चॉपर, विळा, दगड अशा हत्यारांनी जबर मारहाण करून खून केला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रावळगावी राहुलनगरमध्ये ही घटना घडली. मयत राजेंद्र थोरात याचा भाऊ महेंद्र जिभाऊ थोरात (४२) यांनी फिर्याद दिली. मयत राजेंद्र थोरात यांनी संजय मोतीराम पवार याला विचारणा केली की, तुझ्या मुलाने माझ्या आईचा हात का पिरगळला या कारणावरून कुरापत काढून संजय पवार, गणेश संजय पवार, कृष्णा तोताराम पवार, दिनेश संजय पवार, करीना संजय पवार, संगीता संजय पवार, मोतीराम चिंधा पवार, सिंधूबाई मोतीराम पवार अशा नऊ जणांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून हातात गुप्ती, चॉपर, विळा, कात्री, दगड घेऊन फिर्यादीचा भाऊ राजेंद्र थोरात याला जबर मारहाण केली. गणेश पवार याने चॉपरने फिर्यादीच्या भावास जीवे ठार मारले तर संजय पवार याने फिर्यादीची भावजई निर्मला राजेंद्र थोरात हिच्यावर धारदार हत्याराने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास जमादार काळे करीत आहेत.शिक्षिकेच्या घरात घुसून विनयभंगमालेगाव : शेळ्या बांधण्यावरून व नळाच्या कारणावरुन मोतीपुरा भागातील शनिवार वॉर्ड येथे राहणाºया शिक्षिकेच्या घरात अनाधिकाराने घुसून तिला शिवीगाळ करीत विनयभंग करणाºया व जीवे ठार मारण्याची धमकी देणाºया नऊ जणांविरुद्ध किल्ला पोलिसात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिलेने शनिवारी फिर्याद दिली. अशपाक अहमद अकील रहेमान व तिच्यासोबत चार जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. अशपाक अहमद याने लज्जास्पद वर्तन केले.
रावळगाव येथे तरुणाचा खून; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:20 IST
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे राहुलनगरात तुझ्या मुलाने माझ्या आईचा हात का पिरगळला अशी विचारणा करणाऱ्या राजेंद्र जिभाऊ थोरात या तरुणाचा नऊ जणांनी गुप्ती, चॉपर, विळा, दगड अशा हत्यारांनी जबर मारहाण करून खून केला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावळगाव येथे तरुणाचा खून; गुन्हा दाखल
ठळक मुद्देअशपाक अहमद याने लज्जास्पद वर्तन केले.