शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारू न पाजल्याने डोक्‍यात पहार घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:46 IST

येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे मृतदेह घटनास्थळीच झाकून ठेवत सर्व सहकारी रात्रभर या मृतदेहासोबत झोपून राहिले.

येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी, (दि. १४) रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास सोमठाण जोश येथे विहिरीचे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. यात राजू राठोड (३५, रा. जिंतूर जि. परभणी) यास सहकारी संशयित दिलीप बाबुराव देवरे (रा. कुराड ता. पाचोरा जि जळगाव), दत्तू विश्वनाथ कोकाटे (रा. कोकणगाव ता. निफाड), देवराम एकनाथ जाधव (रा. पिंपळगाव बसवंत ता. निफाड), संतोष ऊर्फ विनायक पवार (रा. हिसवळ ता. नांदगाव) आदींनी दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात हातापायावर लोखंडी पहार, फावडे आदींनी जबर मारहाण केली. यात राजू राठोड याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतदेह घटनास्थळीच झाकून ठेवत सर्व सहकारी रात्रभर या मृतदेहासोबत झोपून राहिले.सकाळी या घटनेची माहिती विहीर मालक तुकाराम विठोबा खरात यांना समजताच त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी, सहायक निरीक्षक एकनाथ भिसे उज्ज्वलसिंह राजपूत, पोलीस शिपाई आबा पिसाळ, राजू चव्हाण, दीपक सांगळे, सतीश मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांना पोलिसीखाक्या दाखविताच खुनाच्या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. तालुका पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.दरम्यान, घटनास्थळी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी भेट दिली असून, याप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादंवि ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेDeathमृत्यू