शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मजुराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 13:16 IST

मालेगाव : म्हाळदे शिवारातील खासगी कत्तलखान्यात काम करणाऱ्या फिरोज जाफर शेख (३६) रा. गवंडी, मुंबई याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करणाऱ्या आसाम येथील परप्रांतीय संशयित मजुराविरूद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव : म्हाळदे शिवारातील खासगी कत्तलखान्यात काम करणाऱ्या फिरोज जाफर शेख (३६) रा. गवंडी, मुंबई याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करणाऱ्या आसाम येथील परप्रांतीय संशयित मजुराविरूद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत फिरोज याचा भाऊ परवेझ जाफर शेख याने पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते दीड वाजेच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला. फिरोज व संशयित आसाम येथील परप्रांतीय मजूर एका खोलीत राहत होते. आपसात वाद झाल्याने संशयित परप्रांतीय तरूणाने फिरोज याच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाजीर शेख, पोलीस उपनिरीक्षक भामरे, मोरे, हवालदार बब्बू सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रारंभी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती; मात्र परवेझ शेख यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज हा गेल्या चार महिन्यांपासून खासगी कत्तलखान्यात कामाला लागला होता. त्याच्या पत्नीचा दोन वर्षापुर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात दोन मुले व दोन मुली, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक