इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनसमोर असलेल्या श्रीजी पलाझाशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचालक रामचंद्र राम पराग निशाद (३७) यांचा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी रोशन सुभाष कोटकर व त्याचा साथीदार महेश भगवान लभडे या दोघांच्या अवघ्या पाच तासांतच मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील श्रीजी प्लाझा अपार्टमेंटशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेज चालक रामचंद्र रामपराग निशाद यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करत मध्यरात्रीच्या सुमारास खून केल्याची घटना घडली होती. मारेकऱ्यांनी निशाद यांचा खून केल्यानंतर गॅरेजमधील एक कार सुद्धा पळवून नेली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्यातील मागील वीस दिवसांत खुनाची ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरविले. त्यात निशाद यांच्याकडे दोन महिन्यापासून कामाला असणारा कामगार रोशन सुभाष कोटकर (रा. येवला) सुमारे पाच दिवसांपासून त्याच्या गावाला निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गॅरेजच्या कामावरून गॅरेजचालक निशाद व कोटकर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच वाद होत असल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांना संशय बळावला. त्यातच गॅरेजमधून पळवून नेलेली कार पोलिसांना येवलारोडवरील माडसांगवी येथे बेवारस अवस्थेत सापडल्यामुळे संशयाला पृष्टी मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके व पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे या दोघांचे दोन पथक येवला येथे रवाना झाले होते. तेथे त्यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता रोशन सुभाष कोटकर व महेश भगवान लभडे ( रा. निमगाव मढ, ता.येवला) या दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर करीत आहेत.
गॅरेज व्यावसायिकाचा कारागिराकडूनच खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 00:31 IST
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनसमोर असलेल्या श्रीजी पलाझाशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचालक रामचंद्र राम पराग निशाद (३७) यांचा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी रोशन सुभाष कोटकर व त्याचा साथीदार महेश भगवान लभडे या दोघांच्या अवघ्या पाच तासांतच मुसक्या आवळल्या आहेत.
गॅरेज व्यावसायिकाचा कारागिराकडूनच खून
ठळक मुद्देदोघांना अटक : किरकोळ वादाचे कारण