शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उसनवार घेतलेल्या सातशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:48 IST

नाशिक : उसनवार घेतलेले सातशे रुपये परत देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याच्याजवळील १८ हजार रुपयांची रोकड घेत फरार झालेल्या संशयित संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देउलगडा : मोहदरी घाटात आठवडाभरापूर्वी आढळला होता मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उसनवार घेतलेले सातशे रुपये परत देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याच्याजवळील १८ हजार रुपयांची रोकड घेत फरार झालेल्या संशयित संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या.मोहदरी घाटात २० जुलै रोजी एका युवकाचा मृतदेह आढळला होता. सातपूर परिसरात राहणारे संदीप व अशोक महाजन हे दोघे मित्र सिन्नर औद्योगिक वसाहतीतून दुचाकीवरून नाशिककडे येत होते. यावेळी संदीपने अशोककडे उसनवार घेतलेले सातशे रुपये मागितले. मात्र अशोकने ते देण्यास नकार दिला. यावेळी संदीपने त्यास ‘अठरा हजार रुपये तुझ्याकडे आहे, मग सातशे रुपये का देत नाही’ असा प्रतिप्रश्न केला असता त्याने नंतर देतो असे सांगितले; मात्र त्याचा राग मनात धरून मोहदरी घाटातील वनोद्यानाजवळ दुचाकी थांबवून संदीपने अशोकच्या डोक्यात दगड टाकून त्यास ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले असे पोलिसांनी सांगितले. मोहदरी घाट परिसरातील वनोद्यानाजवळ २० जुलैला एक मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सिन्नरला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अशोक बारकू महाजन (३८, रा. सातपूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली असता महाजन व संदीप सोनवणे हे दोघे सिन्नरला सोबत काम करीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अशोक महाजन याचा खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. १८ हजारांची रोकड घेऊन फरारमित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याला ठार मारल्यानंतर संदीप हा अशोकजवळील १८ हजारांची रोकड घेत दुचाकीने फरार झाला होता. तो सातपूर येथील अशोकनगर येथे येऊन वावरत होता. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सहायक निरीक्षक अनिल वाघ, सहायक उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके आदींनी अशोकनगरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी