शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील ग्राहक संघाच्या माजी सभापतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:55 IST

सटाणा : शहरातील सहकारी ग्राहक संघाचे माजी सभापती राजू दिनकर सरदार (५०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सटाणा : शहरातील सहकारी ग्राहक संघाचे माजी सभापती राजू दिनकर सरदार (५०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सरदार यांचा मृतदेह दोधेश्वर घाटात त्यांच्याच कारमध्ये आढळून आला असून, डोक्यात वार करून त्यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.सदर घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती व शहरातील व्यवसायिक राजू दिनकर सरदार यांची इंडिगो मांझा कार (क्रमांक एमएच ०४ ईएफ २४०३) शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील दोधेश्वर घाटात आढळून आली. गुरुवारी सकाळच्या सुमारास पोलीसपाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले असता सरदार यांचा मृतदेह गाडीच्या मागील सीटवर आढळून आला. त्यांच्या डोक्यावर पाठीमागून बांधकामावरील टॉमीने दोन वार केल्याचे दिसून आले. टॉमी घटनास्थळी आढळून आली आहे. सरदार यांचा मोबाइलही मिळाला असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अजय महाजन आदींनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाने दिशा न दाखवल्याने खून गाडीतच केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.-------------------------------अज्ञात बोलेरो गाडीची चर्चासरदार हे बुधवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलीस चौकीवरून गप्पा मारत टिळकरोडने त्यांच्या कारने मार्गस्थ झाले. त्यानंतर सकाळी ही दुर्दैवी खबर मिळाल्यानंतर निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घटनेपासून हाकेच्या अंतरावर एक बोलेरो गाडी आणि तीन अज्ञात व्यक्ती उभ्या असल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी बघितल्याचे बोलले जात आहे. तर नामपूर रस्त्याने दोधेश्वर फाट्यावरून कोळीपाडामार्गे दोधेश्वरच्या जंगलात आल्यावर हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक