शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी तिघा भावंडांना सक्तमजुरी

By admin | Updated: December 28, 2015 22:52 IST

जिल्हा सत्र न्यायालय : सांजेगाव येथील घटना

नाशिक : किरकोळ कारणावरून ज्ञानेश्वर देवराम गोवर्धने (३०), सोपान देवराम गोवर्धने (२७) आणि नितीन देवराम गोवर्धने (२३) या तिघा भावंडांनी मिळून किरकोळ कारणावरून कुरापत काढून रामहरी पोपटी ढिरेंगे (३९, रा. सांजेगाव) यांच्या डोक्यात फावडा मारून गंभीर दुखापत केली होती. त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याप्रकरणी तिघा आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.१२ फेब्रुवारी २०१४ रोजी इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे कुरापत काढून ढिरेंगे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत गंभीर दुखापत केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. सदोष मनुष्यवधाप्रकरणी आरोपींना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे. सांजेगावच्या देवराम गोवर्धने यांच्या घराच्या अंगणात १२ फेब्रुवारी रोजी रात्री हरिनाम सप्ताहानिमित्त भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामहरी ढिरेंगे हेदेखील भोजनासाठी तेथे आले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ढिरेंगे जेवन करत असताना तिघा आरोपींनी कुरापत काढून त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ज्ञानेश्वर गोवर्धने याने फावड्याच्या दंडुक्याने ढिरेंगे यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी ढिरेंगे यांच्या पत्नीसह मुलांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान १३ फेब्रुवारी रोजी ढिरेंगे यांचा मृत्यू झाला. तिघा भावंडांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोरे यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षाच्या अ‍ॅड. वतीने प्रमोद मोरे यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या कायद्याखाली आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.