शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हमाल खून प्रकरण; संशयित फरार

By admin | Updated: March 6, 2017 01:08 IST

पंचवटी : घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे.

 पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील काम आटोपून घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत़ दरम्यान, या प्रकरणी मयत दीपकचे वडील दगडू सोपान अहिरे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली व्यवसाय करणारा दीपक अहिरे हा काम आटोपून दुचाकीवरून घराकडे (एमएच १५ सीएच ६३७३) परतत असताना चार ते पाच मारेकऱ्यांनी बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल उत्तम हिरा समोर अडवून धारदार शस्त्राने पाठीवर वार केले़ यामध्ये वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी झालेला दीपक हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित फरार झाले़ या घटनेनंतर पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच परिसरातील दुकानाबाहेर बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी केली होती. दीपक अहिरे याचा संशयितांनी खून का केला याचे कारण समोर आले नसून मारेकऱ्यांना जेरबंद केल्यानंतरच या खुनाचे गूढ उकलणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणात काही संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ (वार्ताहर)