शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:02 IST

नाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे२०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. हा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर टाळला तर दुर्घटनादेखील कमी होण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासन, वनविभाग, पोलीस प्रशासनाकडून सातत्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नायलॉन मांजाचा वापर, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील काही पक्षीप्रेमींशी संपर्क साधला वर्षभरात नायलॉन मांजाने कापले १५० पक्ष्यांचे पंखधक्कादायक : बहुसंख्य जायबंदी झालेले पक्षी पडले मृत्युमुखी; झाडावरील मांजात अडकून सर्वाधिक दुर्घटनाअसता त्यांनी सांगितले की, दरवर्षी मकरसंक्रांतीनंतर जखमी पक्ष्यांचे रेस्क्यू कॉलची संख्या खूप वाढते. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही डिसेंबरपासूनच असे कॉल शहरातील पक्षीप्रेमींना येण्यास सुरुवात झाली होती. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ८० पक्षी मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.चला ‘त्यांची’ही संक्रांत गोड करूया...मकरसंक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ वाटप करत ‘गोड बोला’ असे सांगितले जाते, मात्र मकरसंक्रांत यावर्षी तरी पक्ष्यांसाठी ‘गोड’ ठरावी, यासाठी आपण मनुष्य म्हणून काही जबाबदारी पार पाडणार आहोत का? असा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. कारण दरवर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत वर्षभर विविध झाडांवर नायलॉन मांजाच्या जाळ्यात पक्षी अडकून जायबंदी होतात अन् मृत्युमुखीही पडतात. दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे. चालू २०२० वर्षात तरी पक्ष्यांवर ओढावणारे संकट दूर करण्यासाठी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकूया.. इको फ्रेण्डली संक्रांत साजरी करूया..

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल