शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे स्मार्ट कार्ड : मोफत असूनही योजनेचा फज्जा काढले पन्नास हजार, वाटले अवघे शंभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 02:04 IST

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली.

ठळक मुद्देस्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडालावाटप विभागीय कार्यालयांमधून सुरू करण्यात आले

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली. परंतु, सहाही विभागांत अवघ्या शंभर नागरिकांनीच स्मार्ट कार्डला प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, स्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडाला आहे.महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात येस बँकेच्या सहयोगाने नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ बॅँकेच्या सहकार्याने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी करदात्या भाग्यवान ५० हजार नागरिकांना प्रीपेड स्मार्ट कार्ड मोफत देण्याची योजना आणली गेली. त्यानुसार, महापालिकेने नियमित कर भरणा करणाºया नागरिकांमधून ५० हजार लोकांची निवड करून त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय प्रसिद्ध केली. त्याचे वाटप विभागीय कार्यालयांमधून सुरूही करण्यात आले. परंतु, गेल्या सहा-सात महिन्यांत सहाही विभागांतून अवघ्या १०० नागरिकांनाच स्मार्ट कार्डचे वाटप होऊ शकले असून, अनेक नागरिकांनी ते मोफत असूनही नाकारले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक आपल्याला स्मार्ट कार्ड मोफत मिळणार आहे, याची खबर संबंधित निवड झालेल्या नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचविण्यात आली नाही. सदर स्मार्ट कार्ड संबंधीची माहिती देणारे एसएमएस निवड झालेल्या नागरिकांच्या मोबाइलवर पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले. परंतु, तशीही कार्यवाही झाल्याचे दिसून आली नाही. स्मार्ट कार्डकरिता नागरिकांना केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार होती. केवायसीकरिता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेकरिता नागरिकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागणार होता. निवड करण्यात आलेल्या नागरिकांना आधार कार्डसह कार्ड प्रदान डेस्कवर समक्ष उपस्थित राहावे लागणार होते. त्यानंतर डेस्कवर आधार कार्डाची नोंदणी तसेच स्कॅनिंग व अपलोडिंग केले जाणार होते. केवायसीकरिता दिलेल्या कागदपत्रांची छाननी येस बँकेच्या केवायसी पडताळणी टीमकडून झाल्यानंतर कार्ड सक्रि य केले जाणार होते. शिवाय, नागरिकांना देण्यात येणारे कार्ड हे प्रीपेड असल्याने नागरिकांना ते रिचार्ज करावे लागणार होते. कार्ड मोफत देणार असले तरी नागरिकांना बॅँक खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागणार होती. एवढा सारा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी नागरिकांनी सदर कार्ड मोफत असूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे, सहाही विभागांत पन्नास हजार नागरिकांमधून अवघे शंभर नागरिकच लाभार्थी ठरले असून, त्यातही अनेकांना बळजबरीने कार्ड दिल्याची चर्चा आहे.