शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

अट्टाहासामुळे रखडली महापालिकेची  शिक्षण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:27 IST

महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यास सत्ताधारी भाजपाकडूनच अडचणी उत्पन्न झाल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपाने समितीऐवजी पुनश्च शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. शासनाने नियमानुसार समिती गठित करण्याच्या सूचना देऊनही भाजपातील पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासामुळे समिती रखडली आहे.

नाशिक : महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यास सत्ताधारी भाजपाकडूनच अडचणी उत्पन्न झाल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपाने समितीऐवजी पुनश्च शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. शासनाने नियमानुसार समिती गठित करण्याच्या सूचना देऊनही भाजपातील पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासामुळे समिती रखडली आहे. मनसेच्या सत्ताकाळात राज्यातील भाजपा सरकारनेच शिक्षण मंडळ बरखास्त करत शिक्षण समिती स्थापन करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, महासभेने ठराव केल्यानंतर मागील पंचवार्षिक काळात शिक्षण समिती गठितही करण्यात आली होती. शिवाय, सभापती-उपसभापतींची निवड करण्यात आली होती. परंतु, महापालिकेच्या ताब्यात गेलेल्या शिक्षण समितीला कोणतेही आर्थिक अधिकार नसल्याचे कारण दर्शवित तत्कालीन सभापती संजय चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मागील वर्षी फेबु्रवारीत महापालिकेची सार्वजनिक निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाकडून शिक्षण समिती गठित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिक्षण समितीवर जाण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातीलही नगरसेवक उत्सुक होते. परंतु, भाजपाच्या गटनेत्यांनी महासभेत प्रस्ताव मांडत सदर शिक्षण समितीऐवजी पूर्वीप्रमाणेच शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आणि तसा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु, शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती स्थापनेचा निर्णय हा राज्यभरासाठी लागू केलेला असल्याने तो एकट्या नाशिक महापालिकेसाठी बदलता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले होते.  तरीही सत्ताधारी भाजपातील पदाधिकाºयांनी शिक्षण मंडळ स्थापनेचा आपला अट्टाहास कायम ठेवल्याने अद्यापही समिती गठित होऊ शकलेली नाही. त्यामुळे शिक्षण समितीवर जाण्याचे स्वप्न पाहणाºया नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.पदाधिकारी अजूनही आशावादीशिक्षण मंडळ गठित होण्याबाबत सत्ताधारी भाजपातील पदाधिकारी अजूनही आशावादी आहेत. शासनाकडून निश्चितच शिक्षण मंडळाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे पदाधिकाºयांकडून सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांना समितीवर सदस्य म्हणून संधी मिळावी, यासाठीच हा अट्टहास असल्याचेही समर्थन केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका