शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा दिव्यांगांना देणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:49 IST

दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नाशिक : दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी निधीची तरतूद असते, परंतु त्याचा उपयोग यापूर्वी केला जात नसे. मात्र गेल्या तीन वर्षांत महापालिकेने त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, शाळा व महाविद्यालयासाठी मदत देण्यापासून दिव्यांगांच्या विवाहासाठी योजनादेखील आखण्यात आल्या आहेत. प्रौढ दिव्यांगांना भत्तादेखील दिला जात आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षण असते, परंतु अनेक दिव्यांगांची स्पर्धा परीक्षांसाठी खासगी क्लासेस लावण्याइतपत आर्थिक स्थिती नसते. त्यामुळे महापालिकाच आता अशाप्रकारचे प्रशिक्षण देणार आहे.स्टाफ सिलेक्शन, यूपीएससी आणि एमपीएससी यांसारख्या परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादेत बसणाºया इच्छुकांकडून महापालिकेने अर्ज मागविण्याचे ठरविले आहे. आलेल्या अर्जातून पात्र व्यक्तींची निवड केली जाईल. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाºया संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येईल आणि त्यांच्या मार्फत राजीव गांधी भवनात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती समाजकल्याण उपआयुक्त शिवाजी आमले यांनी दिली.दिव्यांगांसाठी मुख्यालयात सुविधामहापालिकेने गेल्या वर्षभरात मुख्यालयात दिव्यांगांना येणे-जाणे सोपे पडेल अशा पद्धतीने खास सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, तिन्ही मजल्यांवर विशेष मार्गिका आणि प्रसाधनगृह अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात नसतील अशा प्रकारच्या सर्व दिव्यांगस्नेही सुविधा कदाचित केवळ नाशिक महापालिकेतच उपलब्ध आहेत.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक