शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अंदाजपत्रकासाठी नगरसेवकांची ओढाताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अंदाजपत्रक सापडू नये, परंतु त्याहीपेक्षा अंदाजपत्रकाला स्थायी समितीलाच पूर्णाधिकारात करता यावे यासाठी स्थायी समितीचा आटापिटा सुरू आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अंदाजपत्रक सापडू नये, परंतु त्याहीपेक्षा अंदाजपत्रकाला स्थायी समितीलाच पूर्णाधिकारात करता यावे यासाठी स्थायी समितीचा आटापिटा सुरू आहे. दुसरीकडे आयुक्तांनीदेखील सोमवारी (दि.७) खातेप्रमुखांना आपल्या खात्याच्या मागण्या दोन दिवसांत कळविण्याची मुदत दिली आहे.लोकसभा निवडणुकीमुळे मार्च महिन्यापासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा अंदाजपत्रकीय महासभादेखील फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होत असताना आयुक्तांनी सादर केलेल्या वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांचे अंदाजपत्रक करण्यात येणार आहे. परंतु त्याचवेळी समिती सदस्यांनी ते जानेवारीअखेरपर्यंतच सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थायी समितीतील आठ सदस्य २८ फेबु्रवारीस निवृत्त होत असतात. २० फेबु्रवारीस अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीत आठ दिवसांत काय बदल करू शकेल? असा प्रश्न सदस्यांना आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना आपल्या प्रभागातील विकास कामांचा समावेश करायचा असतो, परंतु तोच साध्य होणार नसेल तर समितीवर सदस्य म्हणून असल्याचा काय उपयोग? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.  महापालिकेचे अंदाजपत्रक लेखा विभाग करीत असतो. परंतु लेखा अधिकारी डॉ. सुहास शिंदे हे मध्यंतरी रजेवर होते. त्यामुळे अंदाजपत्रकाचे काम पडेल, असे मत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी व्यक्त केले होते.  परंतु लेखापाल नसले तरी कामकाज थांबून राहत नाही असे सांगून अंदाजत्रकाचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. अर्थात, खातेप्रमुखांना त्यांच्या खात्यासाठी किती रक्कम लागेल याबाबतचा प्रस्ताव देण्यास सांगूनही विलंब झाल्याने सोमवारी (दि.७) आयुक्तांनी खातेप्रमुखांना माहिती सादर करण्याची दोन दिवसांची मुदत दिली आहे.समितीला काम करणे अशक्यस्थायी समितीत जानेवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले, तर ते फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस दुरुस्तीसह प्रशासनाकडे पाठवतील, मग ते महासभेवर जाईल आणि एप्रिल महिन्यात त्यावर निर्णय होऊ शकेल. परंतु २० फेब्रुवारीस अंदाजपत्रक झाले तर समितीला काम करणे अशक्य होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प