शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : विभागीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा ३,७६४ दिव्यांगांचे पेन्शनसाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:26 IST

नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे१४ कोटी रुपयांची तरतूद३,७६४ दिव्यांगांनी अर्ज सादर केले

नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसाठी आतापर्यंत महापालिकेकडे ३,७६४ दिव्यांगांनी अर्ज दाखल केले आहेत. दिव्यांगांना सदर अर्ज दाखल करण्यासाठी आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध उपक्रमांची आखणी केलेली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे १४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. येत्या दोन महिन्यांत सदर निधी महापालिकेला खर्च करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अहमदनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातही दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे दिव्यांगांना विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार, मनपा मुख्यालयात आतापर्यंत ३,७६४ दिव्यांगांनी आपले अर्ज पेन्शन योजनेसाठी सादर केले आहेत. ज्यांनी अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांगांना आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार वर्गवारी सुरू केली असून, लवकरच त्याबाबतचा परीपूर्ण प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भंडारी यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीने दिले जात होते. मात्र, शासनाच्या नव्या निर्णयानुसार, महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकाच्या स्वाक्षरीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीची सुविधा उपलब्ध करून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहितीही डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.फिरत्या दवाखान्याला प्रतिसादमहापालिकेने २६ जानेवारीपासून दिव्यांगांसाठी फिरता दवाखाना कार्यान्वित केला आहे. गेल्या चार दिवसांत आतापर्यंत सात दिव्यांगांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. याशिवाय, मंगळवारी (दि.३०) सातपूर येथील नॅब कार्यशाळेतील ३० दिव्यांगांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. उपचाराची गरज भासणाºया दिव्यांगांनी सदर फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१२२) व वाहनचालक यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१३३) या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत फिरता दवाखाना पोहोचणार आहे.