लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मागील महासभेत नालेसफाईबाबत मांडलेल्या लक्षवेधीसंबंधी पश्चिम विभागाच्या प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्यावर थेट आरोप करणारे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या मनमानी कारभारावर आता हेमलता पाटील यांनी टीकास्त्र सोडले असून, महापालिकेत सत्ताकेंद्र नेमके महापौरांचे की सभागृह नेत्यांचे असा जिव्हारी लागणारा सवाल भाजपाला केला आहे. डॉ. पाटील यांच्या टीकेमुळे महापालिकेत आता पाटील विरुद्ध पाटील असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दि. १४ जून रोजी शहरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेसह नालेसफाईचे पितळ उघडे पडले होते. त्यानंतर दि. १९ जून रोजी झालेल्या महासभेत सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यासह डॉ. हेमलता पाटील यांच्यावरही थेट आरोप केले होते. त्यामुळे मोठा गदारोळ होऊन महापौरांना महासभा गुंडाळावी लागली होती. आता डॉ. हेमलता पाटील यांनी सभागृह नेत्याच्या मनमानी कारभारावर बोट ठेवत महापालिकेत सत्ताकेंद्र नेमके कुणाचे, असा सवाल उपस्थित केला आहे. पाटील यांनी म्हटले आहे,
महापालिकेत पाटील विरुद्ध पाटील
By admin | Updated: July 5, 2017 00:57 IST