शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने २० गावांच्या तोंडाला पुसली पाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:40 IST

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या खेड्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये म्हणजेच १० कोटी रुपये देण्याचा अंदाजपत्रकातील निर्णय सत्ताधिकाºयांनी फिरवला आहे. हा निधी महापालिकेने अचानक घुसवलेल्या रस्ता कामांसाठी ग्रामीण भागाच्या विकासाचा निधी वर्ग केला असून, त्यामुळे वर्षभरात खेड्यांमध्ये कोणतीही नवीन विकासकामे होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्दे१० कोटी रुपये देण्याचा निर्णय सत्ताधिकाºयांनी फिरवलामहापालिकेत सामील होऊनही गावपण हटले नाही नागरिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले

नाशिक : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या खेड्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये म्हणजेच १० कोटी रुपये देण्याचा अंदाजपत्रकातील निर्णय सत्ताधिकाºयांनी फिरवला आहे. हा निधी महापालिकेने अचानक घुसवलेल्या रस्ता कामांसाठी ग्रामीण भागाच्या विकासाचा निधी वर्ग केला असून, त्यामुळे वर्षभरात खेड्यांमध्ये कोणतीही नवीन विकासकामे होणार नसल्याचे स्पष्ट झाले  आहे.  महापालिका स्थापन करताना तीन भूतपूर्व नगरपालिकांबरोबरच २० खेडीदेखील एकत्र करण्यात आली. मात्र, महापालिकेत सामील होऊनही त्यांचे गावपण हटले नाही. ग्रामीण भागातील असुविधांप्रमाणे या खेड्यांमधील अवस्था असल्याने महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी अशीच येथील करदात्यांची भावना असते. त्यामुळे अशा खेडे परिसराचा समावेश असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी तेथील नगरसेवकांची मागणी असते. यंदाही महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत अशी मागणी झाल्यानंतर खेडे विकासासाठी यंदा विशेष तरतूद करण्यात आली आणि प्रत्येक गावाला ५० लाख रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. म्हणजेच एकूण दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खेड्यातील अनेक प्रलंबित कामे होतील, असा स्थानिक नगरसेवकांनी आणि नागरिकांनी विश्वास व्यक्त केला होता.  प्रत्यक्षात मात्र, महापालिकेने घुमजाव केले आहे. गेल्याच महिन्यात महासभेत अचानक २५८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांचा अचानक घुसविण्यात आला आणि तो मंजूरही झाला. विशेष म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने त्यावेळी अशा संशयास्पद प्रकाराला मूक संमती देऊन आर्थिक विषयावर भाजपाला साथ दिली होती. त्याच शिवसेना नगरसेवकांसमोर ग्रामीण भागातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले.  ग्रामीण भागासाठी विशेष तरतूद झाल्याने हुरळून गेलेल्या काही नगरसेवकांनी बांधकाम विभागाकडे फाईली नेल्यानंतर शहर अभियंत्यांनीच त्यांना खेडे विकासासाठी असलेला सर्व निधी रस्त्यांच्या कामांसाठी वळविल्याचे सांगितले.  अंदाजपत्रक संमत झाल्यानंतर ऐनवेळी कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव जरी मंजूर झाला तरी निधी कोठून आणणार, असा प्रश्न केला जात होता. त्यामुळे सत्ताधिकारी आणि प्रशासनाने अशी शक्कल लढविली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका