शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डासमुक्त शहरासाठी मनपाची जागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:05 IST

शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

नाशिक : शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.  दोन वर्षांपूर्वी शहरात डेंग्यूने थैमान घातले होते. हजाराहून अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली होती. मात्र, मागील वर्षी डेंग्यूचा प्रभाव काहीसा ओसरला होता. आता गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंग्यू रोखण्यासाठी आणि डासमुक्त शहरासाठी जागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने आणि प्रामुख्याने घरांमधील फ्रीज, मनी प्लांट, वॉटरकूलर यामध्ये त्यांची उत्पत्ती होत असल्याने सदर ठिकाणी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत लोकांमध्ये जागृती करीत  आहेत.  महापालिकेतील मलेरिया विभागातील २६८, आशा कर्मचारी १५३ आणि ३० बहुद्देशीय सेवक यांच्याकडे हे जागृतीचे काम सोपविण्यात आले आहे. नागरी सहभागाशिवाय डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने घरोघरी जाऊन तपासणीवर भर दिला आहे. दरम्यान, डेंग्यूचे डास आढळून आल्यास सदर पाण्याचा साठा ड्रेनेज लाइन अथवा टॉयलेटमध्ये न टाकता तो रस्त्यावर अथवा मातीत नष्ट करावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका