शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मनपा प्रशासन आता आॅनलाइन

By admin | Updated: April 11, 2015 00:37 IST

ईआरपी संगणकीयप्रणाली : सर्व विभागांचे कामकाज संगणकावर

नाशिक : साडेपाच हजार कर्मचारी, दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आणि १७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराच्या विकासाचा भार आपल्या डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेने गतिमान प्रशासनाच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असून, १ एप्रिलपासून ईआरपी (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाजच आता आॅनलाइन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व विभागातील इत्यंभूत घडामोडी एका क्लिकसरशी संगणकाच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. परिणामी, प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन लालफितीचा कारभार संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. गतिमान प्रशासनासाठी शासनाने सन २००५ मध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचे धोरण जाहीर केले होते. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय कामकाज एकसूत्री व्हावे यासाठी शासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला समन्वयक म्हणून नेमले होते. मात्र, नाशिक महापालिकेने त्यापूर्वीच संगणकीयप्रणालीच्या दृष्टीने पावले उचलली होती. तीन-चार वर्षांच्या प्रयत्नानंतर क्रिसिल आणि झेन्सर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मदतीने मनपाने सर्व माहिती संकलित करून प्रशासकीय कामकाज संगणकाच्या पडद्यावर उतरविण्यात यश मिळविले आहे. याबाबत मनपाचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितले, यावर्षाचे अंदाजपत्रक ईआरपी संगणकीय-प्रणालीनुसार आयुक्तांनी सादर करत त्याची सुरुवात केली आहे. या प्रणालीनुसार महापालिकेतील सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, त्यांचे सेवापुस्तक, त्यातील वेळोवेळी होणाऱ्या नोंदी, भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन योजना आदि माहिती प्रशासनातील प्रत्येक विभागाला संगणकावर पाहता येणार आहे. त्याचबरोबर लेखा विभागाचे संपूर्ण हिशेब, जमा-खर्चाचा ताळेबंद, निविदाप्रक्रियांची स्थिती यांचीही माहिती आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. ईआरपी प्रणालीत स्टोअर मॅनेजमेंटही समाविष्ट करण्यात आले असून, त्यानुसार महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषधांचा साठा, औषधांची एक्सपायरी डेट, वाहन भांडारामधील स्थिती आदिंची माहिती उपलब्ध होणार आहे. सदर प्रणालीने मनपातील सर्व विभाग एकमेकांशी जोडले जात असून, विभागातील प्रत्येकाला सर्व विभागांची माहिती बसल्याजागी उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे बनावट नोंदी करण्यालाही पायबंद बसणार असून, पूर्ण माहिती देणे बंधनकारक असणार आहे. या प्रणालीमुळे गतिमान प्रशासन संकल्पना राबविण्यास खूपच मदत होणार असल्याची माहितीही राजेश लांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)