सिन्नर : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक गावांमध्ये मंगळवारी आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. वावी - सिन्नर तालुक्यातल्या वावी येथे मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या शोकसभेत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपसरपंच विठ्ठल राजेभोसले, विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे, रामनाथ कर्पे, कारभारी वेलजाळी यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी कन्हैयालाल भुतडा, किरण घेगडमल, अशोक मालपाणी, श्यामसुंदर मालपाणी, दिलीप कपोते, मंदार केसकर, फरीद आत्तार, किशोर जाधव, काशीनाथ भुतडा, नंदलाल मालपाणी, दिलीप खाटेकर, बबन ताजणे, जगन्नाथ शिंदे, संतोष जोशी, नवनाथ गोरडे, बाळासाहेब खाटेकर, नवनाथ घेगडमल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.पास्ते- तालुक्यातल्या पास्ते येथील ग्रामस्थांनी मारुती मंदिरात शोकसभा घेऊन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच नेताजी काकड यांनी अल्पसंख्याकांचा वाघ गेल्याची प्रतिक्रिया आपल्या भाषणात व्यक्त केली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, नवनाथ घुगे, जयंत आव्हाड यांनी आपल्या भाषणातून मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शरद आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, रामदास घुगे, वसंत आव्हाड, जगन आव्हाड, सुदाम आव्हाड, गोपीचंद आव्हाड, शरद कुटे, दामू उगले, गणपत उगले, श्रीधर आव्हाड, संपत आव्हाड, विश्वास घुगे, भाऊलाल घुगे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.पांगरी- सिन्नरच्या पूर्वभागातील पांगरी येथे गोपीनाथ मुंडे यांना शोकसभेद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, राजू पेखळे, जगन गायकवाड, दिनकर कलकत्ते, विष्णू कलकत्ते, उत्तम पेखळे, गणेश सालके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.नायगाव- सिन्नर तालुक्यातल्या नायगाव खोर्यात मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांत मोठी शोकसभा झाली. या शोकसभेला नायगावसह जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी, सावळी, पिंपळगाव निपाणी येथील हजारो नागरिक उपस्थित होते. सिन्नर-सायखेडा चौफुलीवर घेण्यात आलेल्या शोकसभेत ‘ मुंडेसाहेब अमर रहे’ या घोषणा देण्यात आल्या. शोकसभेच्या प्रारंभी गावातून फेरी काढण्यात आली. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली. आमदार पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांची जागा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सिन्नर-सायखेडा चौफुलीला गोपीनाथ मुंडे यांचा नाव देण्याचा ठराव याप्रसंगी करण्यात आला. (वार्ताहर)