शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंढेगाव येथे बहुदिव्यांग मुलीने बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:04 IST

घोटी : लोकशाही व्यवस्था बळकट होऊन सक्षम शासन निर्माण करण्यासाठी चिमुकले योगदान म्हणजे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत बहुदिव्यांग मुलीने आपला हक्क बजावला.

घोटी : लोकशाही व्यवस्था बळकट होऊन सक्षम शासन निर्माण करण्यासाठी चिमुकले योगदान म्हणजे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत बहुदिव्यांग मुलीने आपला हक्क बजावला. एकीकडे शरीराने सक्षम मतदारांकडून मतदान करण्यास उदासीनता वाढीला लागली असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अशा स्थितीत बहुदिव्यांग मुलीच्या मतदानाच्या इच्छेला निवडणूक यंत्रणा धावून आली. सर्व स्वयंसेवक आणि यंत्रणेच्या रूग्णवाहिकेने बहुदिव्यांग मुलीला घरापासून मतदान केंद्र ते पुन्हा घर असे महत्वपूर्ण सहकार्य केले. मुंढेगाव ता. इगतपुरी येथील कु.कविता अर्जुन गतीर (२२) ही बहुदिव्यांग मतदार आहे. आपल्या देशाचे जागरूक नागरिक बनून लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी म्हणून तिने मतदान करण्याचे निश्चित केले. याबाबत पंचायत समतिीचे रिसोर्स शिक्षक बाप्पा गतीर यांना तिची आत्मीयता समजली. त्यांनी मतदान केंद्रातील वाहन घेऊन विविध स्वयंसेवकांच्या मदतीने तिला मतदानाच्या हक्कासाठी मतदान केंद्रात आणले. तिने उत्स्फूर्तपणे मतदान करून सक्षम मतदारांना एक आदर्श उभा केला. मतदान केंद्रातुन तिला पुन्हा घरपोच करण्यात आले. यावेळी तिच्या एका कृतीने मतदानाची व्यवस्था भक्कम करण्यास मोठा हातभार लागला असे बाप्पा गतीर यांनी सांगितले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांना या घटनेबाबत समजताच त्यांनी कु. कविता गतीर हिचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक