शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:29 IST

वाडीवहे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली.

नाशिक : वाडीवहे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली. वाडीवºहेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमळी पर्वतावर मुंबई येथील ‘चक्रम’ हायकर्स या प्रसिद्ध गिरीभ्रमंती करणाऱ्या संस्थेच्या १४ गिर्यारोहक ांचा समूह गिर्यारोहणासाठी दाखल झाला होता. आमळी गडालगत असलेल्या पायथ्याच्या दहेगावात हे गिर्यारोहक मुक्कामी थांबलेले होते.‘चक्रम’मार्फत २३ ते २५ मार्च दरम्यान आमळी गड (गडगड्या), रांजणगिरी, बहुला, कावनई अशा ट्रेकिंग मोहीम आखळी होती. प्रणव नाफ डे हे या मोहिमेचे प्रमुख, तर मंगेश पंडित हे उपप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. शनिवारी सकाळी गिर्यारोहकांनी आमळी गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. या समूहातील काही ट्रेकर्स गडाच्या निम्म्यावर असलेल्या देवी मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. गिर्यारोहणाच्या सर्व साहित्य घेऊन सज्ज असलेल्या या ग्रुपमधील गिर्यारोहक हे सातत्याने महाराष्टÑातील विविध गड-किल्ल्यांवर चढाई करतात. आमळी गडावरील अवघड अशी कडा सर करण्यासाठी दोरीची आवश्यकता भासते. सुरक्षेच्या कारणास्तव या कडावर दोरी ठोकण्यासाठी या समूहातील तिघे पुढे जात असताना हेमेंद्र सुरेश अधटराव (२७,रा.बोरिवली, मुंबई) या तरुण गिर्यारोहकाचा अचानकपणे पाय घसरल्याने ते शेकडो फूट खोल दरीत कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने हेमेंद्र यांचा मृत्यू झाला. हेमेंद्र हे पुण्यात नोकरीला राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घडल्याचे सचिव अनिकेत रहाळकर यांनी सांगितले.वैनतेय , गावकयांची धाव‘चक्रम’च्या गिर्यारोहकांनी घटना स्थानिक वैनतेय गिरीभ्रमण संस्थेला कळविली. वैनतेयचे पथक सर्व आवश्यक साधनसामुग्री घेऊन वाडीवºहेच्या दिशेने रवाना झाले. ‘चक्रम’चे पथक गडावरील वरच्या बाजूने हेमेंद्र यांचा शोध घेत होते, तर वैनतेयचे दाखल झालेले पथक पायथ्याला दरीमध्ये शोध घेत होते. दरम्यान, गावकरीही मदतीसाठी धावले. ‘चक्रम’च्या पथकाला हेमेंद्र हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Accidentअपघात