शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका : दोनवेळा कारवाईनंतर उड्डाणपुलाखाली पुन्हा बकाल स्वरूप प्राप्त विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:35 IST

मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या भागाला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.गजरा विक्रेत्यांचा अनधिकृत डेरा उठणार का कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे? असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानका द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे चार रस्ते येतात, त्यामुळे चौफुलीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे, तेथेच आंघोळ, स्वयंपाक, झोप मलमूत्र विजर्सन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबईनाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने कारवाई करून सुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’च होत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही दररोज घडत असून, जीवितहानी वाट बघत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.