शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उच्च न्यायालयाने गोडसेंचे फेटाळले अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:29 IST

इगतपुरी : प्रशासनाची दिशाभूल करून जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवणाऱ्या घोटी खुर्द ( ता. इगतपुरी ) येथील पदच्युत थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. नाशिकच्या जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी मंदाकिनी गोडसे यांच्याविरोधात दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला आहे. आधीच पदच्युत झालेल्या असल्याने मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद न्यायालयीन आदेशाने संपुष्टात आले आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : आत्माराम फोकणे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

इगतपुरी : प्रशासनाची दिशाभूल करून जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवणाऱ्या घोटी खुर्द ( ता. इगतपुरी ) येथील पदच्युत थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. नाशिकच्या जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी मंदाकिनी गोडसे यांच्याविरोधात दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला आहे. आधीच पदच्युत झालेल्या असल्याने मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद न्यायालयीन आदेशाने संपुष्टात आले आहे.राज्यातील जातपडताळणी समित्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या जातपडताळणी प्रस्तावांची तपासणी करून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने ८ महिन्यांचा कालावधी आदेशात ठरवून दिला आहे. कायद्याप्रमाणे जलद प्रक्रिया केल्यास निवडणूक विवाद कमी करण्यास मदत होण्यासाठी राज्य सरकारला सुद्धा आदेशीत करण्यात आले आहे.अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातीचे जातप्रमाणपत्र रद्द खोट्या पुराव्यांच्या आधारावर काढण्यात आल्याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी तक्रार केली होती.विविध पुराव्यांच्या आधारावर गोडसे यांचे पद रद्द करण्याची त्यांची मागणी होती. त्यानुसार नाशिकच्या जातपडताळणी समितीने मंदाकिनी गोडसे यांच्या प्रकरणी चौकशी करून न्यायालयीन कामकाज केले. समितीच्या आदेशानुसार मंदाकिनी गोडसे यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावा अवैध झाल्याचा आदेश नाशिकच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता.त्यानुसार नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदाकिनी गोडसे यांना सरपंचपदावरून पदच्युत केले. याविरोधात गोडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून समितीचा निर्णय कायम केला असल्याने अखेर त्यांची पदावरून गच्छंती झाली आहे. राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाले आहे.माझ्याकडील भक्कम पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने मंदाकिनी गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. शेवटी सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. आता अनेक मुद्यांवर न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढा देणार आहे. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे असे मी समजतो. न्यायदेवतेच्या आदेशाचे मी स्वागत करतो.- आत्माराम फोकणे, तक्रारदार.

टॅग्स :sarpanchसरपंचMumbai High Courtमुंबई हायकोर्ट