मुल्हेर : येथे दसरा (विजयादशमी) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामानुज संप्रदायाप्रमाणे व येथील ग्रामदैवत श्री उद्धव महाराज संस्थानच्या नियमाप्रमाणे दशमी ही तिथी दोन दिवस असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ग्रामस्थांनी साजरा केला. दुपारी देवघरापासून देवांची मिरवणूक काढून श्री उद्धव महाराज समाधी मंदिरातील श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित महारुद्र हनुमानाचे पूजन करण्यात आले. रासक्रीडा उत्सवाच्या तयारीची सुरुवात दांडी उभारून करण्यात आली. यानंतर परिसरातील शमी वृक्षाचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. ाावेळी हनुमानाच्या गौरवाची भजनेही गाण्यात आली.सायंकाळी मुल्हेर किल्याजवळील भारवट मारूतीचे पूजन करून सोने लुटण्याचा आनंद नागरिकांनी घेतला.
मुल्हेरला दसरा साजरा
By admin | Updated: October 6, 2014 00:09 IST