शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक उपकेंद्राला दोन महिन्यांत मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:56 IST

गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. ११) विद्यापीठातील बैठकीत केल्याची माहिती सिनेटचे स्वीकृत सदस्य अमित पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देउदय सामंत यांची घोषणा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बैठकीत घेतला आढावा

नाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठनाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. ११) विद्यापीठातील बैठकीत केल्याची माहिती सिनेटचे स्वीकृत सदस्य अमित पाटील यांनी दिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या विविध समसस्यांसह नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्रांविषयी आढावा घेतला. यावेळी उदय सामंत यांनी नाशिक उपकेंद्राविषयी सकारात्मक भूमिका घेत येत्या दोन ते तीन महिन्यांत उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन उपस्थित सिनेट सदस्य व पदाधिकाऱ्यांना दिले. पुणे विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्र्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष विद्यापीठात बैठक घेत विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच उपकें द्रांच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपकेंद्रांच्या कामाला गती देण्यासाठी शासन आदेश काढण्याची गरज कुलगुरू नितीन करमाळकर यांनी यावेळी व्यक्त करताच येत्या पंधरा दिवसांत यासंदर्भातील शासन आदेश काढून दोन महिन्यात बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे सामंत यांनी जाहीर केले. यावेळी प्र-कुलगुरू उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माने, सिनेट सदस्य अमित पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.उपकेंद्राची प्रतीक्षा संपणारनाशिकमध्ये स्वतंत्र विद्यापीठ उपकेंद्र कॅम्पस उभारण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे ६२.५ एकर जागा शासनाकडून देण्यात आलेली आहे. परंतु, सुरुवातीला स्थानिक नागरिकांचा विरोध, त्यानंतर त्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न यामुळे उपकेंद्राच्या कामास अजूनही सुरुवात होऊ शकलेली नाही. २०१८ मध्ये विद्यापीठ कॅम्पसचे काम पूर्ण झालेले असेल, असे सांगण्यात आले होते. परंतु २०१३-१४ पासून असलेली प्रतीक्षा आजही कायम आहे. परंतु, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन महिन्यात भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची घोषणा केल्याने नाशिक उपकेंद्राच्या कामाला आता लवकरच मुहूर्त मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ