शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त; नाशिकच्या उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे, स्वाती थवील यांची बदली

By अझहर शेख | Updated: June 13, 2023 14:50 IST

राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

नाशिक : राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थवील यांची पाटबंधारे क्रमांक-१च्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर संगमनेरचे उप विभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९साली मंगरुळे यांची नाशिकमधून बदली करण्यात आली होती.

महिनाभरापासून नाशिक विभागातील विनंती बदल्या रखडल्या होत्या. अखेर या बदल्यांचे आदेश शासनाने काढले आहेत.नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांमधील उपजिल्हाधिकारी संवर्गातील आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदुरबारचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांची मालेगाव येथे उपविभागीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील विजयानंद शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. भुसूधार विभाग, नाशिकचे सहायक आयुक्त कुंदनकुमार सोनावणे यांची सहायक अयुक्त (मावक) नाशिक येथे निलेश जाधव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सहायक आयुक्त भूसूधार पदी प्रशासक, नवनगर राज्य रस्ते विकास महामंडळात मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेले विठ्ठल सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगरूळे यांनी यापुर्वी २०१९-२३पर्यंत संगमनेर उप विभागीय अधिकारी तर २०१३-२०१६ पर्यंत निफाडचे उपविभागीय अधिकारी आणि २०१६-२०१९पर्यंत उपजिल्हाधिकारी नाशिक म्हणून काम पाहिले आहे. सोनावणे यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाचे भुसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.