शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मफलर, टोपीसाठी लागणार दहा रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:44 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यानिमित्ताने पक्षचिन्हाचे पोस्टर बॅनर्स वापरले जात आहेत. आदर्श आचारसंहिता लागू करण्यापूर्वी काहीही निर्बंध नसले तरी आता मात्र प्रत्येक प्रचार साहित्याची नोंद त्याचा खर्च नोंदवला जाणार आहे. कोणत्याही चौक सभा किंवा खासगी मालमत्तेच्या जागेवर प्रचार साहित्य लावण्याचेदेखील दर आहेत त्यानुसार कापडी बॅनरसाठी २०० रुपये, जाहिरात फलकासाठी तीनशे, तर झेंडे दहा रुपये प्रति नग असा खर्च असेल. पोस्टर बॅनर, झेंडे, प्रचारचे मफलर, टोपी सभेच्या ठिकाणी वापरल्यास त्यासाठी प्रति नग १० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी कापडी बॅनर्ससाठी (तीन बाय दोन फूट) २०० रुपये, खासगी जागेवर जाहिरात फलक (दहा बाय दहा) साठी तीनशे रुपये प्रति नग असा दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीसाठी बुथ उभारल्यास दीडशे रुपये प्रति बुथ, दहा बाय दहा अकारचे बुथसाठी ९०० रुपये असे दर आहेत.चौक सभा स्वस्तातजाहीरसभांसाठी मोठी मैदाने महाग, तर ठरतातच शिवाय त्याठिकाणी मंडप उभारणी आणि अन्य खर्चदेखील खूप असतो. त्या तुलनेत चौक सभा सर्वांत स्वस्त पडतात. चौकात सभा घेण्यासाठी अडीचशे रुपये मोजावे लागतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय