शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चिखलातून करावे लागते मार्गक्रमण

By admin | Updated: August 7, 2014 02:01 IST

चिखलातून करावे लागते मार्गक्रमण

नाशिक : शहरात साडेचारशे कोटी रुपयांची रस्त्यांची सुरू असलेली कामे आणि दुसरीकडे स्थायी समिती सभापतींनी खड्डेमुक्त नाशिकची केलेली घोषणा अशा पार्श्वभूमीवर बोधलेनगरच्या पाठीमागील बाजूस मात्र नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नाही. उलट पावसाळ्यात चिखल होत असल्याने त्यातून मार्गक्रमण करण्यासाठी सर्कस करावी लागत आहे.बोधलेनगर परिसराचा मागील भाग गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला आहे; परंतु त्या प्रमाणात रस्त्यासारखीही सुविधा दिली जात नाही. येथील रो-हाऊसच्या परिसरात तीन वर्षांपूर्वी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अजूनही या भागात पक्के रस्ते बांधण्यात आलेले नाहीत. परिणामी दर पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. चिखलामुळे या भागात कोणीही रिक्षाचालक येण्यास तयार नसतो. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये मुलांना तसाच प्रवास करावा लागतो. अनेकदा वृद्ध आणि मुलांचे पाय घसरून दुखापत झाली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रभाग ३१ मधील दोन्ही नगरसेवकांना निवेदने दिली आहेत, तसेच पालिकेतदेखील तक्रारी केल्या आहेत. परंतु आजवर कोणीही दखल घेतली नसून आता नागरिकच आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खड्डे बुजवण्यासाठी दौरा करणाऱ्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी किमान या भागात आधी रस्ता करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)