शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:19 IST

श्याम खैरनार सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील ...

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : खड्ड्यांनी आणला वाहनधारकांच्या नाकात दम

श्याम खैरनारसुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरश: नाकात दम आणला आहे. सुरगाणा ते उंबरठाण व उंबरठाण ते बर्डीपाडा या गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेल्या फरशी पुलावर खड्डे पडून तुंबलेल्या पाण्यातून वाहन नेताना मोठे भगदाड तर नसेल ना याची भीती निर्माण होते. याआधी याच फरशी पुलावर भगदाड पडून वाहतुकीस काही दिवस अडथळा निर्माण झाला होता. खरे तर या फरशी पुलाची थोडी उंची वाढवणे गरजेचे होते.येथील बाराबंगला जवळील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले असून, परिणामी वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच या रस्त्याचे काम इस्टीमेट प्रमाणे सुरू करून पूर्ण करून खोळंबणारी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.कायम रहदारी असलेल्या घाटमाथ्यावरील चिराई ते नागझरी फाटा या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, हरणटेकडीपासून पुढे अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची तर वाट लागली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सुरगाण्याहून वणीकडे जाण्यासाठी हा मधला व अतिशय महत्त्वाचा मार्ग असूनही हा रस्ता चांगला प्रतीचा व्हावा यासाठी कुणाकडूनही प्रयत्न झालेले दिसून आले नाही. या खराब रस्त्यामुळे असंख्य वाहनधारक बोरगावमार्गे जाणे पसंत करतात. खुंटविहीरकडे जाणारा रस्ता देखील खराब झाला आहे.चिंचपाडा फाटा ते रगतविहीर हा रस्ता गेली काही वर्षे नूतनीकरणासाठी प्रतीक्षेत आहे. ठाणगाव इळींगपाडा रस्त्याची तर वाट लागून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून दुचाकी नेताना चालकांना सर्कस करावी लागत आहे. भवानदगड फाटा ते सतखांब या जुन्या रस्त्याचे नवीन रस्त्यात रूपांतर अद्यापही झाले नसल्याने या रस्त्याचीही वाट लागली आहे. यासारख्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी रस्तेच नाहीतखुंटविहीर ते पिंपळसोंड रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे नवीन डांबरीकरण झाले नाही.भवानदगड फाटा - सतखांब बारी, ठाणगाव - इळींगपाडा, मनखेड - माणी, माणी - उंबरदे (प.), बाऱ्हे - खोकरविहीर, पळसन - बाऱ्हे, बाऱ्हे - ठाणगाव - बेडसे, राक्षसभुवन - ठाणगाव, मनखेड - जाहुले, मनखेड - कवेली - माणी - सुरगाणा, दोडीपाडा - म्हैसखडक, चिराई - हरणटेकडी - नागझरी फाटा, आंबोडे - केळावण, चिंपाडा फाटा ते रगतविहीर व तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत, पांगारणे - उदमाळ, पांगारणे - रांजुणे इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच भिवतास धबधबा जवळील फरशी पुलाच्या बाजूने काही वर्षांपासून खचलेला भराव अद्याप भरण्यात आलेला नाही. पिंपळसोंड - उदमाळ, उंबरपाडा - पिंपळसोंड - पारधी वस्ती, पिंपळसोंड - तातापाणी, उंबरपाडा - कुंभारचोंड वस्ती, रांजुणे - करवळपाडा आदी ठिकाणी रस्ता निर्माण करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार