शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

‘एमएसएमई’ रोजगार देणारा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:39 IST

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.

ठळक मुद्देआशुतोष रारावीकर : बीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत उद्योजकांना मार्गदर्शन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राह्मण व्यावसायिकांच्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. ११) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासह व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते.राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठ्या प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणाºया अडचणींवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून, अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रुटी दूर करण्याची गरज आहे.जे उद्योग अडचणीत आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उद्योग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उद्योग व उद्योगाचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उद्योगास भरपूर वाव असून, या क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे आशुतोष राराविकर यांनी अधोरेखित केले.आरबीआयच्या सूचनेनुसार एमएसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून, तीन दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ब्राह्मण समाजातील तरुणवर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहे. ऐतिहासिक कालखंडात निर्माण झालेल्या समाजनिहाय व्यवस्थेत कामांची विभागणी केलेली होती. परंतु आता चित्र पूर्णपणे बदलले असून उद्योग व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आगामी काळात अर्थकारण हे पूर्णपणे बौद्धिक क्षमतेवरच असेल. त्यामुळे बुद्धिजीव समाजाने उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे.- संदीप झा, अध्यक्ष, संदीप फाउंडेशन.