शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे कार्यालय धोकादायक इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

येथील नगरपालिकेच्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू असून, येथील कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. इमारतीची एकूणच परिस्थिती लक्षात घेता या कक्षाचा भाग केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. मात्र वारंवार मागणी करूनही महावितरणच्या कक्ष कार्यालयास सुरक्षित जागा मिळू शकलेली नाही.

भगूर : येथील नगरपालिकेच्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू असून, येथील कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. इमारतीची एकूणच परिस्थिती लक्षात घेता या कक्षाचा भाग केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. मात्र वारंवार मागणी करूनही महावितरणच्या कक्ष कार्यालयास सुरक्षित जागा मिळू शकलेली नाही.  भगूर पालिकेच्या रुग्णालयाची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीची दुरवस्था झाल्याने येथील रुग्णालय सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू आहे. सदर इमारतीचा मागील भाग ढासळला आहे, तर भिंतींना तडे गेले आहेत. भिंतीवर झुडपे उगवली असून, काही भिंतींना ओल आलेली आहे. अशा परिस्थितीतही या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी काम करीत आहेत.  १९४४ साली परिसरातील दानशूर श. र. झंवर यांनी भगूर पालिकेसाठी दवाखाना बांधून दिला होता. या इमारतीमध्ये बरेच वर्षे नगरपालिकेचा दवाखाना सुरू होता. मात्र वेळचेवेळी देखभाल दुरुस्ती न झाल्याने सदर इमारत मोडकळीस आली असून, इमारतीची दुर्दशा सुरू असतानाच येथील दवाखाना बाजूलाच सुरू असलेल्या महिला प्रसूतिगृहाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला. आता मात्र या ठिकाणी महावितरणचे कार्यालय सुरू आहे.  कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी येथील कार्याेलय सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात यावे, नगरपालिकेनेदेखील जुना इमारत पाडून टाकून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी भूगर परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून होत आहे.भिंतींना गेले तडेभगूर येथील धोकादायक जुन्या दवाखान्यातील दोन खोल्या आतल्या बाजूने बºयापैकी दिसत असल्यातर भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीचे दगडी बांधकाम असल्याने सीमेंट, माती पडल्याने दगड उघड्यावर आले आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे.  ४इमारतीचा पाठीमागील भाग तर काही प्रमाणात कोसळलादेखील आहे अशाही परिस्थितीत विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता कार्यालय या ठिकाणी सुरू आहे.