शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांचे दत्तक साल्हेर गाव मोबाईलच्या रेंजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:26 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील साल्हेर या पर्यटनस्थळासह अन्य गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. साल्हेर हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलेले आहे. यासंबंधीचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करत पाठपुरावा केला होता. अखेर एका खासगी कंपनीने परिसरात मोबाईल टॉवर उभारल्याने रेंज या आदिवासी पट्ट्याच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा लाभला आहे.

ठळक मुद्देदिलासा : आदिवासी पट्ट्यात खणखणू लागल्या मोबाईलच्या रिंग; ग्रामस्थांमध्ये समाधान

साल्हेर, पायरपाडा, भिकारसोंडा, साळवण, महादर, छोटामहारदर, केळझर, तताणी, सावरपाडा, बारीपाडा, वग्रीपाडा, घुलमाल, भाटंबा आदी गावामध्ये बी.एस.एन.एल.सह अन्य कंपनीची रेंज नव्हती. बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील छोट्या-छोट्या खेड्यांमध्ये रेंज नसल्यामुळे येथील रेशन दुकानदार व तसेच मोबाईल धारक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर या परिसरात एका खासगी कंपनीने टॉवर उभे केले असून त्यामुळे साल्हेर परिसरातील आसपासच्या खेड्यांना रेंज मिळू लागली आहे. साल्हेर हे गाव माजी संरक्षण राज्यमंत्री व विद्ममान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतले असून हे गाव नेहमीच विकासापासून दूर राहिलेले आहे. साल्हेर हे पर्यटन स्थळ असून किल्ल्यावर विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात. याठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील साल्हेर हे पर्यटनस्थळ असून येथे विविध भागातील पर्यटक येत असतात. खेड्यापाड्यांतील रेशन दुकानदार व मोबाईलधारक यांना परिसरात रेंज नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. वेळोवेळी संबंधित अधिकारी व तसेच लोकप्रतिनिधी यांना अनेकवेळा लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली परंतु दखल घेतली जात नव्हती. आता खासगी कंपनीने टॉवर उभारल्याने प्रश्न मिटला आहे.- भास्कर बच्छाव, माजी सदस्य, बागलाण पंचायत समिती

टॅग्स :NashikनाशिकMember of parliamentखासदार