नाशिक : ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा रविवारी (दि. २२) नाशकात येत असून, ९५ वर्षांची परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान होणार आहे. गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल. मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या व्याख्यानात ‘मैं कौन हूॅँ और मैं क्या हूॅँ?’ या विषयावर दर्डा मार्गदर्शन करणार आहेत. राजकारण, समाजकारण व पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या दर्डा यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी नाशिककरांना लाभणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खासदार विजय दर्डा आज नाशकात
By admin | Updated: May 21, 2016 22:37 IST