शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात घुसून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:45 IST

चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. २५) चांदवड नगर परिषदेमार्फतप्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत चांदवड शहरातील पाच प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्यापारी असोसिएशनने निषेध नोंदविला असून, पूर्वसूचना न दिल्याने व दुकानात घुसून कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार आहे का? असा सवाल व्यापारी असोसिएशनने केला.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदी : नगर परिषदेत बैठक; पूर्वसूचना न दिल्याने व्यापारी संतप्त

चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. २५) चांदवड नगर परिषदेमार्फतप्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत चांदवड शहरातील पाच प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्यापारी असोसिएशनने निषेध नोंदविला असून, पूर्वसूचना न दिल्याने व दुकानात घुसून कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार आहे का? असा सवाल व्यापारी असोसिएशनने केला.या पार्श्वभूमीवर चांदवड नगर परिषदेने व्यापारीवर्गाची मंगळवारी (दि. २६) सकाळी अकरा वाजता बैठक बोलवली होती. या बैठकीची पूर्वसूचनाही दिली नव्हती. येथील दत्तात्रय रामभाऊ बोरसे, संतोष रामूलाल अग्रवाल, भाटगावकर हार्डवेअर, व्ही. कुमार जनरल स्टोअर्स, अजित जनरल स्टोअर्स यांच्यावर सदर कारवाई ही नगर परिषदेने नेमलेल्या पथकामधील नगर परिषद अभियंता सत्यवान गायकवाड, यशवंत बनकर, मुकादम, अनिल गायकवाड, मच्छिंद्र जाधव, बनू धोतरे, सागर पवार, संतोष कापसे, सुनील गायकवाड, खंडू वानखेडे, वाल्मीक सकट यांनी केली तर पाचही व्यापाºयांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण पंचवीस हजारांचा दंड वसूल केला आहे.पथकातील अधिकाºयांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नव्हते. ते दुकानात घुसून वाटेल ती कपाटे उघडून वस्तू तपासत होते, असा अधिकार त्यांना आहे का ? असा संतप्त सवाल व्यापाºयांनी करून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्याच्या विचारात काही व्यापारी आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी बारा वाजले तरी मुख्याधिकारी अभिजित कदम व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष उपस्थित नव्हते. यामुळे सकाळी अकरा वाजेपासून आलेले व्यापारी संतप्त झाले. त्यांनी बैठकीस न बसण्याचा निर्णय घेतला व बैठकीस अधिकारीच नसल्याने आम्ही परत जात आहोत असे पत्र त्यावेळी तयार करीत असतानाच दुपारी बारा वाजेच्या सुमारास मु्ख्याधिकारी कदम यांचे आगमन झाले. त्यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणूक व प्रकृतीचे कारण दाखवित बैठकीस उशीर झाल्याने दिलगिरी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी अभिजित कदम, नगरसेवक मीनाताई कोतवाल, अशपाक खान, अल्ताफ तांबोळी, इंदूबाई वाघ, लीलाबाई कोतवाल उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी सर्व व्यापारी बंधूंना सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यापारी संतप्त झाले. यापूर्वी व्यापाºयांना वैयक्तिक स्वरूपात नोटीस अथवा दवंडी दिली नाही. कॅरिबॅग, प्लॅस्टिक बॅग विक्री करताना कार्यवाही केली असती तर ती मान्य असती; परंतु असलेला स्टॉक दुकानात असून, त्यावर कार्यवाही का केली? ज्या व्यापाºयांकडून दंड वसूल केला तो परत करावा, अशी मागणी व्यापारीवर्गाने केली. यावेळी नगर परिषदेचे सभागृह व्यापाºयांच्या गर्दीने भरले होते. यापुढे व्यापारीवर्गावर जबरदस्तीने कार्यवाही केल्यास चांदवड शहर बंद, आंदोलन छेडू असा इशारा व्यापारी युनियनने यावेळी दिला. मुख्याधिकारी कदम यांनी याबाबत माहिती घेऊन कळवितो असे त्यांनी सांगीतले.यावेळी व्यापारी प्रकाश आबड, भूषण आबड, राहुल आबड, कल्पेश संकलेचा, धीरज संकलेचा, अजित तिल्लोडा, सुनील लुनावत, विकास जाधव, धमेंद्र लोढा, गणेश खैरनार, गुड्डू खैरनार, नीलेश आचलिया, मयूर बाफना, मोनू पलोड, रेवन बिल्लाडे, बाळासाहेब वाघ, नितीन थोरे, बाळासाहेब शेळके आदी यावेळी उपस्थित होते. येत्या शुक्रवारपर्यंत दंडाच्या रकमेवर विचार करू, असे व्यापाºयांना सांगण्यात आले.दुकानातील बºयाच वस्तूंना प्लॅस्टिकचे आवरणदुकानातील बºयाच वस्तूंना प्लॅस्टिकचे आवरण असून, ते काढले तर त्या वस्तू खराब होतील त्यांचे काय ? प्लॅस्टिक कारखाने आधी बंद करा व नंतरच व्यापाºयांकडून दंड घ्या, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या खुर्चीला चक्क प्लॅस्टिक असल्याने व बºयाच कपाटांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅग असल्याने यांच्यावर आपण काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला.