शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय मंडळाचे नवीन कार्यालयात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:25 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाले असून एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरु असतानाच दुसरीकडे विभागीय मंडळाचे रविवार (दि.१)पासून स्थलांतरही सुरू झाले आहे.  त्यामुळे या परीक्षांचे  नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून झाले असले तरी परीक्षेनंतर तपासून येणाऱ्या गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयातूनच जाहीर केले जाणार आहे. 

ठळक मुद्देविभागीय मंडळाच्या कार्यालयासाठी नवीन इमारत मंडळाच्या नवीन इमारतीसाठी 24 कोटींचा खर्च

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाले असून एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरु असतानाच दुसरीकडे विभागीय मंडळाचे रविवार (दि.१)पासून स्थलांतरही सुरू झाले आहे.  त्यामुळे या परीक्षांचे  नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून झाले असले तरी परीक्षेनंतर तपासून येणाऱ्या गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयातूनच जाहीर  केले जाणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासाठी आडगाव येथील पाच एकर जागेवर जवळपास २४ कोटी रुपये खर्चून मंडळासाठी तीन मजली प्रशस्त इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीचे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरण होणे अपेक्षित होते, परंतु डिसेंबर २०१९ उलटूनही इमारतीचे १०० टक्के काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांचे कामकाज द्वारका परिसरातील वाणी हाउस येथील इमारतीतूनच करावे लागले होते. परंतु ही इमारात आता पूर्ण झाली तिचा ताबा विभागीय मंडळाला मिळाल्याने  विभागीय मंडळाकडून जून्या कार्यालयातून नवीन कार्यालयात साहित्य स्थलांतरीत करण्याचे काम रविवारपासून सुरू करण्यात आले आहे.  नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाणी हाउस येथील कार्यालयास दरमाह ४ लाख ६९ हजार रुपये इतके भाडे मोजावे लागत होते. शिवाय येथे दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जमा होणाऱ्या उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी सुरक्षित गुदामही नाही.त्यामुळे या उत्तरपत्रिकाही कमी जागेतच साठवून ठेवत त्याची गोपनीयता जपण्याची तारेवरची कसरत मंडळाला करावी लागते. तुलनेच आडगाव येथील पाच एकर जागेत ९२ हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली इमारत विभागीय मंडळाला मिळाली असून साहित्याचे स्थलांतरण पूर्ण झाल्यानंतर मंडळाचे संपूर्ण कामकाज आडगाव येथील स्वमालकीच्या इमारतीतून सुरू होणार आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षा