शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:20 IST

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पंचवटी : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी तसेच वसतिगृह प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणाºया संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणाºया भाजीचा दर्जा सुधराविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.भोजन पुरवठा करणाºया संबंधित कंपनीला वारंवार लेखी तक्रार करून जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करून शाळेचे प्राचार्य देवरे, गृहपाल एन. एस. चौधरी यांच्याकडे तक्रार करून आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. यापुढे वसतिगृह आवारातच हाताने पोळ्या बनवून देणार तसेच दैनंदिन जेवणात दिल्या जाणाºया भाजीत रस्सा भाजी दिली जाणार अशा अटींवर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत मंगळवारी दुपारी भोजन घेतल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल चौधरी यांनी दिली.४०० पेक्षा अधिक विद्यार्थीपेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. इयत्ता सहावी ते १२वीपर्यंतचे ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात भोजन पुरविण्याचा ठेका टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे. संस्थेकडून पुरवठा केले जाणारे भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर जेवण नाकारले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीfoodअन्न