शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात भात लावणी करून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:29 IST

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावला जोडणाऱ्या समनेरे, मालुंजे, मोगरे, आशाकिरण वाडी या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांत भात लावणी करून अभिनव आंदोलन केले.

ठळक मुद्देमनसेची गांधीगिरी : मुंढेगाव-समनेरे रस्त्याची दुरवस्था

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावला जोडणाऱ्या समनेरे, मालुंजे, मोगरे, आशाकिरण वाडी या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांत भात लावणी करून अभिनव आंदोलन केले. दहा ते पंधरा गावांना जोडणाºया मुंढेगावपासून ते शेवटच्या टोकापर्यंत या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकवेळा छोटे-मोठे अपघातदेखील घडत आहेत. अनेकांचा अपघातात बळी गेला आहे, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सतत माहिती देऊन व तक्रार करूनसुध्दा अधिकाºयांकडून दुर्लक्ष गेले जात आहेइगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, प्रताप जाखेरे, गणेश उगले यांच्या नेतृत्वाखाली मुंढेगाव ते वाघेरे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपांची लावणी करून गांधीगिरी करण्यात आली. अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविण्यात आला. शासनाने लवकरात लवकर या भागातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूळचंद भगत, उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, मनविसे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गणेश उगले आदींनी दिला आहे.आंदोलनात महिलांसह तरु ण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी मुंढेगावचे सरपंच गणेश दळवी, युवा नेते रवि गतीर, उपतालुकाध्यक्ष जनार्दन गतीर, मुंढेगावचे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गतीर, कानिफनाथ गतीर, मनविसे उपतालुका अध्यक्ष पिंटू चव्हाण, भास्कर जाखेरे, नामदेव जाखेरे, गोविंद जाखेरे, गोपाळ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसे