शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनकपातीविरोधी टोल कर्मचा-यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:26 IST

पिंपळगाव बसवंत : प्रशासनाकडून मात्र कपातीचा इन्कार

ठळक मुद्देकपात बंद होत नाही तोपर्यंत निषेध आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोल नाक्यावरील कर्मचा-यांच्या वेतनात कपात केल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत कपात बंद होत नाही तोपर्यंत निषेध आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचा-यांनी केला आहे.पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर दोन वर्षापासून मुंबईतील सहकार ग्लोबल नामक कंपनीला टोल वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीत असंख्य कर्मचारी काम करत आहेत. गेल्या महिन्यापासून कंपनीने टोल कर्मचा-यांच्या वेतनात सुमारे अडीच ते तीन हजार रु पये इतकी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे टोल कर्मचा-यांचे म्हणणे आहे. तर टोल प्रशासनाने कुठलीही पगारात कपात केली नसून कंपनीच्या नियमानुसार पगार वाटप सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सर्व कर्मचारी कामावर रु जू असून वेतन कपातीबाबत दंडाला काळ्या फिती बांधून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवित आहेत. या आंदोलनात सुधीर डांगळे, अतुल गायकवाड, अजीत गांगुर्डे, केदु शिरसाठ, बाळासाहेब पठाडे, मीनाक्षी गांगुर्डे,वैशाली गांगुर्डे,सुवर्णा बोरसे, जयश्री उशिर, भारती शेळके आदींसह टोल कर्मचारी सहभागी झाले आहेत.भुसे यांच्यापुढे मांडल्या व्यथाराज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत येथील टोल कर्मचा-यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत कंपनीने केलेल्या वेतनकपातीची माहिती त्यांना दिली. यावेळी भुसे यांनी कर्मचा-यांची समजूत काढत कंपनीने केलेल्या कपातीची पूर्ण चौकशी करून कर्मचा-यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक