शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी वीज कर्मचारी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:00 IST

मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा देत वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले.

ठळक मुद्दे वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन एक दिवसाआड आंदोलन सुरू

मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा देत वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले.मालेगावी वीज वितरण कंपनी खासगीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. शासनाने मालेगाव विभाग खासगीकरण करण्यासंदर्भात निविदा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी याचा विरोध केला आहे. याचा निषेध करण्यासाठी कंपनीच्या कॅम्प, दाभाडी रस्त्यावरील उपकेंद्रालगत असलेल्या मंडळ कार्यालयावर मालेगावसह सटाणा, कळवण, देवळा कसमादे पट्ट्यातील इतर विभागातील सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी मंडळ कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. खासगीकरणचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करीत केली. खासगीकरणामुळे कर्मचारी व वीजग्राहक हे दोघे भरडले जाणार आहेत तर नवीन कंपनीचे आर्थिक घडामोडी कामकाज सर्वसामान्यांना परवडणार नसल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले तर खासगीकरण रद्द करण्यासाठी संघटनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख यांना निवेदन दिले. आज दुसरे आंदोलन मोतीभवन कार्यालयावर संघटनेतर्फे छेडण्यात आले. यात कंपनी आकस बुद्धीने एकतर्फी कारवाई करून चार चतुर्थश्रेणी कामगारांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांचे निलंबन रद्द करीत खरे दोषी असलेल्या व्यक्तींना समज द्यावी यासाठी आंदोलन केले. दुपारी दीड वाजता मंडळ कार्यालय व दुपारी ४ वाजता मोतीभवन कार्यालय येथे आंदोलन केले असल्याने आजचा दिवस आंदोलनाचा ठरला. आंदोलनामध्ये महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्टÑ वीज कामगार महासंघ, भारतीय वीज कामगार सेना, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, महाराष्टÑ राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय कामगार आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, वीज कर्मचारी उपस्थित होते.