नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील असुविधांबाबत छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्य उपसंचालकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले़ रुग्णालयातील असुविधा सात दिवसांत दूर करण्याची मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी डॉ़ बी़ डी़ पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली़शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाचही जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात; मात्र येथील सर्व विभाग मिळून केवळ १०० कॉटचीच व्यवस्था आहे़ तसेच याठिकाणी अतिउच्च दर्जाच्या मशिनरी असून, त्या धूळ खात पडल्याचा आरोपही संघटनेने केला आहे़ रुग्णालयात कायमस्वरूपी स्पेशालिस्ट डॉक्टर नाहीत. उच्चशिक्षित तांत्रिक कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असून, रुग्णांचे हाल होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ संदर्भ सेवा रुग्णालयातील मागण्या येत्या सात दिवसांत मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अजीज पठाण, शहराध्यक्ष मुस्ताक शेख, गणेश कदम, योगेश निसाळ, इम्तियाज खान, शफिक शेख, श्याम गायकवाड, मोईन शेख, हारून शेख, आरिफ शहा, धरमराज चौहान, अझहर शेख, सलीम पिरजादे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे़ (प्रतिनिधी)
आरोग्य उपसंचालकांच्या दालनात ठिय्या आंदोलन
By admin | Updated: November 19, 2014 01:50 IST