शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:56 IST

नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवसा होणाऱ्या विविध आंदोलनामुळे मेटाकुटीस आलेल्या पोलीस यंत्रणेने आता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाने वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे सांगून आंदोलकांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकायांना सादर केला आहे.

नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवसा होणाऱ्या विविध आंदोलनामुळे मेटाकुटीस आलेल्या पोलीस यंत्रणेने आता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाने वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे सांगून आंदोलकांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकायांना सादर केला आहे. रस्त्याच्या कामानिमित्ताने आता आंदोलनांना याठिकाणी कायमची बंदी घालण्यात येणार असून, त्यासाठी गोल्फ क्लब मैदानाचा पर्याय पुढे आणला जात आहे.  राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत दररोज अनेक आंदोलने केली जातात. सरकार दरबारी मंत्रालयात आपला आवाज पोहोचावा असा हेतू आंदोलनकर्त्यांना असला तरी, मंत्रालयासमोरील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आंदोलने, धरणे, निदर्शने आझाद मैदानावर केले जातात व आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख पदाधिकाºयांना आपल्या भावना मांडण्यासाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरदेखील काहीशी अशीच परिस्थिती असून, दरदिवसा धरणे, निदर्शने, मोर्चा, उपोषणांमुळे जुने मध्यवर्ती बसस्थानक ते मेहेर चौक या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. कधी कधी आंदोलकांकडून थेट रस्त्यावरच रास्ता रोको केला जात असल्याने तर या मार्गावरील दुतर्फा वाहतूक खंडित होते, परिणामी या आंदोलनांमुळे शहराच्या अन्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडून तेथेही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना धावाधाव करावी लागते.  आता तर महापालिकेच्या वतीने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू केले जात असून, तीन महिन्यांसाठी हा रस्ता टप्पाटप्प्याने वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. या मार्गावर एकेरी लेनमधून दुहेरी वाहतूक वळविण्यात येणार असून, त्यातच जर दररोजचे आंदोलने झाली तर कामाचा खोळंबा होण्याबरोबरच वाहतुकीची वाट लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारचे आंदोलने होऊ नये अशा विचाराप्रत पोलीस यंत्रणा आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी मोकळ्या ठिकाणी मोर्चे, निदर्शने, आंदोलन करण्यासाठी पर्यायी जागा जिल्हाधिकाºयांनी सुचवावी तसेच कार्यालयासमोर आंदोलनाला अनुमती न देण्याचा प्रस्तावच पोलिसांनी सादर केला आहे. या संदर्भात  पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे.शिवाजी मैदान की गोल्फ क्लब?पोलिसांनी आंदोलनाची जागा बदलण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकाºयांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. मंगळवारपासून अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्यावरील शासकीय कन्या शाळेकडील बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या महिन्यापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी त्यांना दूर करावे लागणार आहे. वाढते आंदोलने व जागेचा विचार करता आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी मैदान किंवा थेट गोल्फ क्लब मैदानावरच यापुढे आंदोलनांना परवानगी द्यावी लागणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय