शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

संगणक परिचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:53 IST

घोटी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकलेले मानधन तात्काळ द्यावे आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील संगणक परीचालकांनी आज धरणे आंदोलन केले.

घोटी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकलेले मानधन तात्काळ द्यावे आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील संगणक परीचालकांनी आज धरणे आंदोलन केले. इगतपुरी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी विविध घोषणा देऊन शासनाकडे निषेध नोंदवण्यात आला. संगणक परिचालक संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष अंकुश राव यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, विस्तार अधिकारी संजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांवर सकारात्मक विचार करून शासन आणि वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन पाठवण्यात येणार आहे.तालुकाध्यक्ष अंकुश राव म्हणाले की, महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या प्रमुख मागणीसह अजून काही मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगणक परीचालकांचे कुटुंब उपासमार सहन करीत आहे. २०१७ पासूनचे मानधन थकीत असल्याने अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक कामांचे मानधन वाढवण्याबाबतही निर्णय प्रलंबित आहे. त्यानुसार आज इगतपुरी पंचायत समतिी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी संगणक परिचालकांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचा शब्द त्यांना दिला. तालुकाध्यक्ष अंकुश राव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या महिला उपाध्यक्ष श्रध्दा शिंदे, जिल्हा पदाधिकारी गणेश पोरजे, अशोक भारती, सायली शिंदे, मनिषा पोरजे, प्रभाकर गोहीरे, भगवान आवारी, अनिता बर्वे, सोमनाथ भोर, हिरामण गायकर, रामचंद्र म्हसणे, गजानन भगत, संदेश कदम, सागर इचम आदींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक