ंमालेगाव : येथील अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसतर्फे येत्या २२ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सहाव्या वेतनापोटी ईद सणापूर्वी कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये देण्यात यावे, वैद्यकीय भत्त्यात वाढ करून तो दोन हजार रुपये करावा, शासन निर्णयानुसार वाहतूक भत्त्यात वाढ करावी, ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय ८० वर्षे झाले त्यांना १० टक्के निवृत्तीवेतनात वाढ देणे आदिंचा त्यात समावेश आहे. यासाठी सदर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मंगेश सोदे यांंनी दिली आहे.
सफाई मजदूर कॉँग्रेसतर्फे आंदोलन
By admin | Updated: July 17, 2014 00:52 IST