शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:45 IST

संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देसंभाजी महाराजांविरोधात वादग्रस्त लिखाण प्रकरण : गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. असे असतानाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ओळ डॉक्टर शुभा साठे यांनी त्यांच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात लिहिली आहे.समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात लिहिलेल्या वादग्रस्त ओळीमुळे शिवछत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाली आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत छापलेल्या पाठ्यपुस्तकात डॉ. शुभा साठे यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामी करणारे व गैरसमज पसरविणारे लिखाण या पुस्तकातून केले आहे. त्यांचे हे वादग्रस्त पुस्तक महाराष्ट्र सरकारने सर्वशिक्षा अभियानातून मागे घ्यावं व शुभा साठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले.यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, सलीम शेख, किशोर शिरसाठ, मुजाहिद शेख, जीवन रायते, कुणाल बोरसे, राजेंद्र शेळके, अ‍ॅड.चिन्मय गाढे, मुन्ना पाटील, मोतीराम पिंगळे, दिलीप दोंदे, सद्दाम शेख, बाबा चव्हाण, कय्युम शेख, राजेंद्र पगारे, राहुल पगारे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस