शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

विषय समित्यांच्या ३२ रिक्त जागांसाठी इच्छुकांच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:01 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायीसह अन्य समित्यांवर होणार नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची ३२ पदे रिक्त झाली असून, या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्याही सदस्यांची पदे रिक्त असल्याने त्यावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांच्या लॉबिंग सुरू झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी अश्विनी आहेर, समाजकल्याण सभापतिपदी सुशीला मेंगाळ या दोघांची तर अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी संजय बनकर व सुरेखा दराडे यांचीही निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष गायकवाड यांच्यासह बनकर व दराडे या तिघांना विषय समित्यांचे वाटप या विशेष सभेत केले जाणार आहे. मात्र प्रचलित पद्धतीनुसार उपाध्यक्ष गायकवाड यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर संजय बनकर यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती दिली जाण्याची शक्यता आहे. सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती दिली जाईल. पदाधिकाऱ्यांच्या समित्या वाटपानंतर जिल्हा परिषदेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या दोन जागांवरही सदस्यांची वर्णी लागणार आहे. स्थायी समितीचे सदस्य असलेले बाळासाहेब क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले असून, राष्टÑवादीच्या कोट्यातील डॉ. भारती पवार यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिल्याने त्यांचीही जागा रिक्त आहे. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी सेना व राष्टÑवादीच्या इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. ज्या सदस्यांना पदाधिकारी निवडीत डावलण्यात आले, त्यांची नावे यासाठी घेतली जात आहेत. याशिवाय बांधकाम समितीचे सदस्य असलेले संजय बनकर, अश्विनी आहेर, सुरेखा दराडे या तिघांची विषय समिती सभापतिपदी निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागांसाठीही राष्टÑवादी, कॉँग्रेस व सेनेत चढाओढ सुरू झाली आहे. याशिवाय जलव्यवस्थापन समितीचे दोन, कृषी समितीचे सहा, समाजकल्याण समितीचे दोन, शिक्षण समितीवर एक, अर्थ समितीवर पाच व पशुसंवर्धन समितीवर तीन व महिला आणि बालकल्याण समितीवर दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. या समित्यांवर विशेष करून महाविकास आघाडीच्या सदस्यांचीच सर्वाधिक वर्णी लागणार असून, भाजपच्या संख्येबळाच्या तुलनेत काही सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद