शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे वीज केंद्र बंद करण्याच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:23 IST

येथील संच क्रमांक ३-४-५ वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाविरोधात एकलहरेच्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार सोमवारपासून आठ दिवस काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे.

एकलहरे : येथील संच क्रमांक ३-४-५ वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाविरोधात एकलहरेच्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार सोमवारपासून आठ दिवस काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे.  कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी १२ वाजता वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत द्वारसभा घेतली. यावेळी शासनाच्या प्रकल्पविरोधी भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. खासगी कंपन्यांसाठी हा प्रकल्प बंद करण्याचा शासनाचा डाव असून, तो हाणून पाडण्यासाठी सर्व कामगार व इतर घटकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन युनियन पदाधिकाºयांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर डोंगरे, विठ्ठल बागल, सुयोग झुटे, सीताराम चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. पुन्हा दि. २३ रोजी द्वारसभा घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी विनायक क्षीरसागर, सुभाष कारवाल, प्रभाकर रेवगडे, प्रफुल्ल कुलकर्णी, राहुल शेळके, नारायण देवकर, यांच्यासह कामगारवर्ग उपस्थित होते.एकलहरा औष्णिक वीज केंद्राचे १४० मेगावॉटचे दोन संच २०११ मध्ये बंद केले. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष सुरू न करता आहे तेच तीन संच बंद करण्याचा घाट घातला जात आहे. या निर्णयाचा निषेध करून,जोपर्यंत ६६०चा प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत जुन्या संचातील धूर बंद होऊ देणार नाही. अशी भूमिका कृती समितीने घेतली.

टॅग्स :electricityवीज