शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
4
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
5
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
6
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
7
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
8
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
9
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
10
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
11
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
12
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
13
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
14
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
15
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
16
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
17
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
18
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
19
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
20
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

३०० फुट दरीत कोसळून मोटारसायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:27 IST

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील मोरकुरे-तळवाडे दिगर रस्त्यावर हत्ती नदीच्या सुमारे ३०० फुट खोल दरीत मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात एक शेतमजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील मोरकुरे-तळवाडे दिगर रस्त्यावर हत्ती नदीच्या सुमारे ३०० फुट खोल दरीत मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात एक शेतमजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.बागलाणच्या पश्चिम भागातील तळवाडे दिगर गावास मोरकुरे गावाजवळून जोडनारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला हत्ती नदी असून नदीच्या उजव्या बाजूने हा रस्ताजेथुन तळवाडे गावास जोडला जातो त्या बाजूला सुमारे ३०० फुट खोल दरी आहे. रस्त्याच्या अंदाज न आल्याने मोटारसायकल क्र (एमएच १५-३३८६) दरीत गेल्याने या भागात द्राक्ष छाटनीसाठी आलेले शेतमजुर देवीदास धोंडीराम धाणे (६५) रा धोंड गव्हाणवाडी (चांदवड) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा सहकारी प्रकश दामु कडाळे (५५) हे जबर जखमी झाले आहेत . सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील वाहनधारकास तिव्र वळणाचा अंदाज न आल्याने ही दुचाकी थेट नदीपात्राच्या बाजूला दाट झाडीत सुमारे खोल दरित गेल्याने हा अपघात झाला.-----------------------------------सदर रस्ता हा धोकेदायक असल्याने स्थानिक जनतेने अनेक वेळा या रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्याची वेळोवेळी मागणी केली मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या रस्त्यामुळे कळवण आगाराने सुरु केलेली कळवण तळवाडे ही बस सुरक्षिततेतेच्या दृष्टीने बंद केली असून हा रस्ता पठावे, मोरकुरे, चिंचपाडा, सावरपाडा परिसरातील जनतेचा वापराचा मुख्य रस्ता असून येथे भविष्यात मोठा अपघात होउ नये या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी तळवाडे दिगरचे रहिवाशी व सटाना बाजार समितिचे संचालक पंकज ठाकरे, मोरकुरेचे सरपंच काळू ढुमसे, भिलदरचे शिवदास अहिरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक