शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या मोबदल्यासाठी आईचे दोन दशक्रिया विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:37 IST

घोटी : संपत्तीच्या मोहापुढे रक्ताच्या नात्यातीलही बंध गळून पडतात. त्याचा गंभीर प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात असलेल्या गंभीरवाडीत आला. आपल्या आई-वडिलांची संपत्ती आणि ‘समृद्धी’ प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा लाखो रुपये मोबदला आपल्यालाच मिळावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील एका गावात मृत आईचे एकाच दिवशी दोन दशक्रिया विधी घालण्याचा प्रकार शनिवारी (दि. ६) घडला. विधीदरम्यान काही वाद होऊ नये यासाठी मृत पत्नीच्या पतीने पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केली होती. अखेर पोलीस बंदोबस्तातच हा विधी पार पाडला गेला.

ठळक मुद्देइगतपुरी : मुलगा-मुलींकडून स्वतंत्रपणे विधी

घोटी : संपत्तीच्या मोहापुढे रक्ताच्या नात्यातीलही बंध गळून पडतात. त्याचा गंभीर प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात असलेल्या गंभीरवाडीत आला. आपल्या आई-वडिलांची संपत्ती आणि ‘समृद्धी’ प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा लाखो रुपये मोबदला आपल्यालाच मिळावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील एका गावात मृत आईचे एकाच दिवशी दोन दशक्रिया विधी घालण्याचा प्रकार शनिवारी (दि. ६) घडला. विधीदरम्यान काही वाद होऊ नये यासाठी मृत पत्नीच्या पतीने पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केली होती. अखेर पोलीस बंदोबस्तातच हा विधी पार पाडला गेला.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारातील मोठ्या प्रमाणात शेतजमीन समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी शासनाने खरेदी केली आहे. धामणगाव अंतर्गत असणाऱ्या गंभीरवाडी येथील नाना सोमा नाडेकर या वृद्धाची वडिलो-पार्जित शेतजमीन आहे. यातील काही जमीन मुलगा बंडू नाना नाडेकर याच्या नावाने आहे. काही जमीन समृद्धी महामार्गासाठी गेल्याने या जमिनीचा मोबदला मुलाला मिळाला आहे. मात्र वडिलोपार्जित जमीन असल्याने ‘या मोबदल्याचे आम्हीही हक्कदार आहोत. (पान ५ वर)आणि हा मोबदला आम्हालाही दे’ असा आग्रह त्यांच्या बहिणींनी धरला. परंतु, बंडू नाडेकर यांनी मोबदला देण्यास नकार दिला होता.दरम्यान, जयवंताबार्इंचा दशक्रिया विधी असल्याने त्यात काही वाद होऊ शकतो, यामुळे पोलीस बंदोबस्त मिळावा अशा मागणीचा अर्ज नाना नाडेकर यांनी घोटी पोलिसांना दिला होता. त्यात मुलासह त्याच्या कुटुंबीयाने आपल्याला अंत्यविधीच्या दिवशी मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी नाना नाडेकर यांनी आपल्या मुलींना सोबत घेत दशक्रिया विधी पार पाडला, तर बंडू नाडेकर यांनीही स्वतंत्रपणे दशक्रिया विधी केला. दरम्यान, घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या सूचनेनुसार हवालदार बिपीन जगताप यांनी गावात जाऊन परिस्थिती हाताळली आणि दोन्ही बाजूकडे दशक्रिया विधी शांततेत पार पाडला गेला. संपत्तीवरून एकाच गावात दोन ठिकाणी दशक्रिया विधी होण्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.बहीण-भावामध्ये अनेकदा वादआपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलानेच विभक्त ठेवल्याने बहीण-भावामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडले असल्याचे सांगितले जाते. अशातच नाना नाडेकर यांच्या पत्नी जयवंताबाई नाडेकर यांचे दि. २७ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला बंडू नाडेकर यास येऊ दिले नव्हते.