शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आधार नोंदणीसाठी माता-बालकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:14 IST

राज्य सरकारने ग्रामीण भागातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावातील प्रत्येक अंगणवाडीमार्फत गहू, तेल, मटकी, मीरची, हळद, मीठ, मसूर डाळीचे मोफत वाटप गरोदर स्तनदा महिला व तीन वर्षांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी बालकांचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोषण आहारासाठी सक्ती : दिवसभर रांगेत ताटकळत

नाशिक : शासनाने अंगणवाडीत गरोदर व स्तनदा महिला तसेच तीन वर्षांच्या बालकांना पोषण आहाराचा शिधा देण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी मात्र बालकांचे आधार कार्डाची सक्ती केल्यामुळे अशा बालकांचे आधार कार्ड काढण्यासाठी महिलांना लहान बालकांना घेऊन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल व अन्य भागांत कोठेही आधार केंद्राची सोय नसल्याने तेथील महिला व बालकांची गिरणारे व मखमलाबाद येथील आधार केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून गर्दी होवू लागली आहे.

राज्य सरकारने ग्रामीण भागातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावातील प्रत्येक अंगणवाडीमार्फत गहू, तेल, मटकी, मीरची, हळद, मीठ, मसूर डाळीचे मोफत वाटप गरोदर स्तनदा महिला व तीन वर्षांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी बालकांचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आधार कार्डची सोय नसल्याने बहुतांशी आदिवासी महिला व बालकांकडे आधार नोंदणी नाही. शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज असली तरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात आधार केंद्रेच नसल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील आदिवासी महिला व बालकांचे लोंढेच्या लोंढे मखमलाबाद, गिरणारे तसेच लगतच्या भागात आधार केंद्रांचा शोधासाठी वणवण भटकत आहेत. त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील महिलांची मखमलाबाद येथील आधार केंद्रावर सकाळपासून मोठी रांग लागत असून, त्यासाठी त्यांना रोजगार बुडवावा लागत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, देवडोंगरा आदी भागांतील महिला दररोज पहाटेच आधार केंद्राच्या बाहेर बालकांना घेऊन नंबर लावत आहेत. दिवसभर उभे राहूनही आधार कार्ड नोंदणी होत नसून, अनेकांना दोन-तीन दिवसांपासून फेऱ्या माराव्या लागल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक