शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यापासून मातेने वाचविले दोन मुलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:45 IST

लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.लखमापूर शिवारातील इनाम भागात शिवाजी बाबुराव देशमुख यांचे शेतात विहिरीचे खोदकाम चालू होते. त्या खोदकामासाठी राजस्थान येथील कामगार कामाला होते. ते कामगार परिवारासहित तिथेच झोपडीत तात्पुरती वस्ती करून राहत होते. दि. २७ रोजी वेळ सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान विहिरीवर खोदकाम चालू होते मशीनचा मोठा आवाज येत होता . त्याच वेळेस झोपडीत श्रावण धनराज बिल हा सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची निरमा धनराज बिल लहान मुलगी बसलेली होती. त्या मुलांची आई मंजु बिल हया झोपडी बाहेर स्वयंपाक करीत होती.कुठूनतरी अचानक तिथे बिबट्या आला . तिथे स्वयंपाक करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून त्या लहान मुलांच्या दिशेने झोपडी जवळ जाऊ लागला . प्लॅस्टिकने बनविलेल्या झोपडीवर पंजा मारून प्लास्टिक फाडले व झोपडीत प्रवेश करणार तोच त्या मातेचे अचानक मुलांकडे लक्ष गेले. साक्षात समोर बिबट्याच्या रु पात मृत्यू उभा असताना त्या मातेने जीवाची पर्वा न करता आपल्या लहान मुलांच्या दिशेने झोपडीकडे धाव घेतली व मोठ्याने आरडाओरड केली. विहिरीचे काम ज्या ठिकाणी सुरू होते तेथे मुलांना घेऊन पळाली.तेथील मजूर कामगारांनी झोपडीकडे धाव घेतली. त्यांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यांना बिबट्या तेथून दूर जाताना दिसला. जर त्या मातेचे लक्ष झोपडी कडे गेले नसते तर किती मोठा अनर्थ घडला असता याची कल्पना न केलेली बरी.-----------------------------बिबट्याचे वास्तव्य, शेतकरी धास्तावलेलखमापूर शिवारात बिबट्याचे हल्ले झाले .त्या हल्ल्यात शक्यतो लहान मुलेच बिबट्याने भक्ष बनविले आहे.हा शिवार नदीकाठी असल्याने हया भागात बिबट्याचे वास्तव्य कायम असल्याने शेतकरी वर्ग खूप धास्तावला आहे.लखमापूर परिसरात असा एक पण दिवस उजडत नाही की बिबट्याचे दर्शन कोणाला झाले नाही.आज शिवारात असी परिस्थिती गंभीर झाली आहे की कुत्रे थोडे बिबटे जास्त झाले आहेत. आता पर्यंत इतके बिबट्याने हल्ले केले . वनविभागास बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाहिजे तसे यश आले नाही. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी नितीन शिवाजी दळवी, योगेश दळवी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक